Breaking News

‘केदारेश्वर’ पाच लाख टन गाळप करणार : ढाकणे


चापडगाव प्रतिनिधी

केदारेश्वर साखर कारखाना यंदा संचालक मंडळाने स्वतः चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू हंगामात कारखाना ५ लाख टन ऊसाचे गाळप करणार आहे, अशी माहिती अड. प्रताप ढाकणे यांनी दिली. 
केदारेश्वर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ संचालक बापूराव घोडके व त्यांच्या पत्नी पार्वती घोडके यांच्या हस्ते बॉयलर पेटविण्यात आले. अड. ढाकणे म्हणाले, केदारेश्वर साखर कारखाना शेतमजूर कष्टकरी उसतोडणी मजुराच्या मालकीचा आहे. ८० टक्के सभासद उसतोडणी कामगार आहेत. 

यावेळी ह भ प आंधळे महाराज, जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, शेषराव महाराज बटुळे, भाऊसाहेब मुंडे, सतीश गव्हाणे, माधव काटे, तुषार वैद्य, बाळासाहेब शिरसाठ, श्रीकिसन पालवे, त्रिंबक चेमटे, मोहनराव दहिफळे, भाऊराव भोंगळे, पाथर्डी कृषी उत्पन बाजार समिती सभापती बन्शी आठरे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, उपसभापती राजेंद्र गर्जे, नारायण धस, सीताराम बोरुडे, डॉ. राजेंद्र खेडकर, आर्यन खेडकर, महेश बोरुडे, योगेश रसाने, उद्योगपती शेटे, परमेश्वर विखे, शहाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, प्रभारी कार्यकारी अधिकारी रमेश गर्जे, चीफ अकौंट घुगरट आदींसह संचालक, सभासद, कामगार, शेतकरी आदी उपस्थित होते. व्हा. चेअरमन डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.