लोहपुरूष सरदार पटेलांचा सन्मान झाला


अकोले (प्रतिनिधी) लोहपुरूष देशभक्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून संपूर्ण आठवडाभर लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करून ह्या लोहपुरूषाचे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राने स्मरण केले आणि त्यांच्या कार्य कर्तृत्वाला व स्मृतींना उजाळा दिल्याने महाराष्ट्र शासनाचेही या निमित्ताने कौतुक होत असल्याची भावना अकोले तालुका ग्राहक पंचायतच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

देशात जगातील सर्वात उंच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे निर्माण केल्याने शासनाचे सर्वच स्थरातुन अभिनंदन होत आहे. यानिमीत्ताने दत्ता रत्नपारखी, नरेंद्र देशमुख, रमेश राक्षे, शुभम खर्डे, रामदास पांडे, नवनाथ आवारी, दत्ता शेणकर आदींनी उपस्थित राहुन याबाबतचे निवेदन तहसिलदार मुकेश कांबळे यांना दिले.

2018 पासुन 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याने जिल्हाभर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. यावेळी अकोले तहसिल कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सामुहिक शपथ सोहळ्याचेही आयोजन या निमीत्ताने करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली.
या सप्ताहामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार विरोधी भित्तीपत्रके लावणे, याबाबत जगजागृती करणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाजाबाबत मार्गदर्शन करणे, प्रमुख ठिकाणी ग्रामसभा, सायकल रॅली, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचबरोबर सर्व समाजाला कायदेविषयत ज्ञान देऊन, जागृती करण्याचे ग्राहक पंचायतच्या वतीने ठरविण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget