Breaking News

परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनाला गालबोट; पेट्रोलपंपावर दगडफेक


परळी,(प्रतिनिधी) सर्व सामान्य जनतेचे व वाहन धारकांचे जगने मुश्कील करणार्‍या पेट्रोल डिझेल व घरगुती वापराच्या गॅस दरवाढीचा वणवा आता चांगलाच पेटला असुन याचीच झळ पोहोंचत असलेल्या सामान्य जनतेचा आवाज घेवुन युवक कॉंग्रेसच्या वतीने काल रस्त्यावर उतरून सकाळी ११ वाजल्यापासुन पेट्रोल पंपांसमोर उग्र आंदोलन सुरू होते. दरम्यान दुपारी आंदोलनाला गालबोट लागले असून काही कार्यकर्त्यांनी दुबे पेट्रोलपंपावर दगडफेक केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकीमध्ये किती नुकसान झाले याची माहिती मात्र समजू शकली नाही.