Breaking News

नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघड.


नाशिकच्या महानगरपालिका रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. एका महिलेच्या प्रसूती दरम्यान तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

प्रसूती झाल्यानंतर महिलेच्या पोटात अचानक दुखायला लागलं. त्यानंतर तिची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्रसूती झाल्यानंतर आता पुन्हा 20 दिवसांनी महिलेचं ऑपरेशन करून तिच्या पोटातला कापूस काढण्यात आला आहे. पण मुळात कापसाचा गोळा पोटात राहिलाच कसा असा संतप्त सवाला आता महिलेच्या नातेवाईकांकडून विचारण्यात आला आहे.