Breaking News

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम बैठक संपन्न.


बीड, (प्रतिनिधी)- मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०१९ व मतदार यंत्र (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट) आणि व्हिव्हिपॅट (च्या फर्स्ट लेवल चेकिंग यासंदर्भात दि. ८ ऑक्टोंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविणकुमार धरमकर, कॉंग्रेस सेवा दल, बीडचे अध्यक्ष शहादेव मारोती दिक्षेन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, बीडचे सदस्य मोरे रामहरी अशोक, बहुजन समाज पार्टी बीडचे जिल्हाप्रभारी कापसे सतीश पद्माकर,भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी)बीड जिल्हा सचिव कॉ. मोहन जाधव, बहुजन समाज पार्टी जिल्हाप्रभारी शेख अफसर शेख गफूर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) बीड तालुका अध्यक्ष महादेव केशवराव धांडे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस बीडचे सरचिटणीस अँड. विष्णुपंत सोळंके यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच दि. ३१ ऑक्टोंबर,२०१८ या तारखेपर्यंत ज्यांचे नाव मतदार यादीत आले नाहीत,अशा सर्व तरुण, महिला आणि दिव्यांग मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी फार्म नं. ६ भरून द्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले. ज्यांनी नावनोंदणी त्याच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.असेही त्यांनी यावेळी सांगितले. सार्वत्रिक निवडणुका २०१९ करिता भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या एतची व ततझAढी मशीनचे ऋङउ बाबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सविस्तर माहिती सांगितली.
कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथील स्ट्रॉंग रूममध्ये दि.९ ऑक्टोंबर २०१८ पासून सकाळी ९:३० ते सायं. ५. ३० या कालावधीत फर्स्ट लेवल चेकिंग होणार आहे. या चेकिंगच्या वेळेस सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुखांनी उपस्थित राहून सर्व प्रक्रिया स्वतः पहावी व आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींना सुद्धा विधानसभा मतदारसंघ निहाय माहिती दयावी. ज्यामुळे सर्वांना प्रक्रिया पाहता येईल. स्ट्रॉंग रूममध्ये मोबाईल व इतर कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणता येणार नाही. जास्तीत जास्त पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून ऋङउ ची प्रक्रिया पाहावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एमडी सिंह केले.