युवकांनो सन्मानाने जगण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा धागा बना-ऍड.राहुल वायकर


बीड,(प्रतिनिधी): मौजे सांडरवन येथे रविवारी सायंकाळी संभाजी ब्रिगेड शाखेचे उदघाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. या शाखेचे उदघाटन करताना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष राहुलजी वायकर म्हणाले,युवकांनो आजपर्यंत तुमचा वापर करून घेतला आहे,आजपर्यंत आपण स्वाभिमान गहाण टाकून लोकांच्या पत्रावळ्या उचलायचे काम केले आहे.अनेक राजकीय पक्षांनी तुम्हाला नाचायला शिकवले पण संभाजी ब्रिगेड ने तुम्हांला वाचायला शिकवले आहे.तुम्हाला फक्त मागेमागे न फिरवता तुम्ही उद्योगपती बनवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत आहे,यावेळी त्यांनी महिलांना जिजाऊंचा आदर्श घेऊन अंधश्रद्धा यापासून दूर राहून, आपल्या मुलाला व मुलीला चांगले शिक्षण देऊन स्वावलंबी बनवा असे आवाहन केले.युवकांनो सन्मानाने जगण्यासाठी आपल्या धडावर आपलेच मस्तक ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेड चा धागा बनून विस्कटलेल्या समाजघडीला व्यवस्थित करण्याचे आवाहन केले. यावेळी तसेच बहुजन समाजात जागृती होण्यासाठी महापुरुषांच्या ५० प्रबोधनात्मक
पुस्तक वाटपांचा एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. योगेश नरवडे यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की छञपती शिवराय,छञपती संभाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन बहुजन समाजातील युवकांनी जीवनात वाटचाल करावी.नक्कीच तुम्ही यशस्वी होणार.मुंकुद गोरे यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रधान्य दया व युवकांनी उद्योग व्यवसायत यावे असे मत मांडले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget