Breaking News

बहिरनाथ ठोंबरे यांचा स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने मृत्यू


चांदा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथील सेवा सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन बहिरनाथ धोंडिराम ठोंबरे वय ४४ यांचा स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. ठोंबरे यांना काही दिवसांपूर्वी सर्दी ताप येवू लागला. त्यांना नेवासा फाटा येथील उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराचे उपचार केले. त्यांचा आजार आटोक्यात येत नसल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्याचा सल्ला रुग्णांच्या नातेवाईकांना दिला. दरम्यान, पुणे येथे उपचार सुरु असतानाच ठोंबरे यांचे निधन झाले. त्यांचा सोळा वर्षे वयाचा मुलगा तुषार बहिरनाथ ठोंबरे यालादेखील स्वाईन फ्ल्यूसदृश आजारासारखेच लक्षणे आढळुन येवू लागताच त्यालादेखील उपचारासाठी नगर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.