Breaking News

रोड रोडमिओंना चोप द्या; केजमधील विद्यार्थिनींची मागणी


केज (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचे केज शहराकडे होणारे स्थलांतर वाढल्याने केजची व्याप्तीही वरचेवर वाढतच आहे. शहरात शाळा, महाविद्यालयांची संख्याही वाढली आहे. अनेक विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाल्याने केजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. त्यासोबतच रोडरोमिओंची संख्याही वाढल्याने मुलींना नाहक मनःस्ताप शन करावा लागत आहे. त्यामुळे सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून शहरातील विद्यार्थिनींनी रोड रोमिओंना चोप देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

शहरातील महाविद्यालयीन युवतींनी गुरुवारी पोलीस उपअधीक्षक डिसले आणि केज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कांबळे यांना निवेदन देऊन रोडरोमियो विरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. हनुमंत भोसले, शेकापचे भाई मोहन गुंड, दिपक कोल्हे, मुन्ना धस, विकास मिरगणे, अशोक रोडे, प्रा. संतोष राऊत, प्रा. अविनाश घुले, प्रा. श्रीराम सारुक, सतीष मुळे यांनी देखील युवतींच्या मागणीला समर्थ देत रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.