लोकमंथनच्या गुरुदास अडागळे यांची सचिवपदी निवड; द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नियुक्तपत्र


सातारा : पत्रकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशन, महाराष्ट्र या पत्रकार संघटनेच्या सातारा येथे झालेल्या बैठकीत दै. लोकमंथनच्या सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक गुरुदास विष्णू अडागळे यांची सातारा जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनच्या कोअर कमिटीतील सदस्याच्या उपस्थित संस्थापक अध्यक्ष किशोर अबिटकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. 

यावेळी उपाध्यक्ष एम, डी. चव्हाण, सचिव अनिल कदम, कार्याध्यक्ष तानाजीराजे जाधव, राज्य संघटक सेदीप बागड, संस्थापक सदस्य राजू जवंजाळ, मधुकर गलांडे, ताजुद्दीन शेख, ईश्‍वर हुलवान, अमरावती जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा (जैन), सतीश जाधव, सुनील साबळे, सत्यजीत शेडगे, रघुनाथ कुंभार, उमेश लांडगे, सचिन पडवळ, अ‍ॅड. राहुल भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर अबिटकर म्हणाले, द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशन, महाराष्ट्र ही संघटना पत्रकारांच्या सुखदु:खात सहभागी होणारी संघटना असून संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचे कार्य वाढवण्यात येणार आहे. आजच्या घडीला पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही. पत्रकारांनीच आपली संघटीत ताकद दाखवून या समस्यांचा निपटारा करावयाचा आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपली व्याप्ती वाढवण्याचे कार्य प्रत्येक सदस्याने करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी राज्य संघटक संदीप बागड यांनीही उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनच्या आयकार्डचे वितरणही करण्यात आले. सातारा जिल्ह्यात द पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनसाठी नवीन सदस्यांची नोंदणी व संघटनेचे विविध उपक्रम राबवण्याचा मानस नूतन सचिव गुरुदास अडागळे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget