Breaking News

कुकडीचे पाणी प्रत्येक रोटेशनला : पालकमंत्री शिंदे


जामखेड प्रतिनिधी 

ज्यांनी जामखेड, कर्जतचे हक्काचे पाणी अडवले होते, आज तेच माझ्या कानाजवळ येऊन आम्हाला पाणी द्या म्हणत आहेत. परंतु मी ४ हजार कोटी रुपयांची योजना मंत्रीमंडळात मंजुरी घेऊन कायमस्वरूपी सर्वासाठी कुकडीचे पाणी हे दर रोटेशन प्रमाणे मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. चोंडी येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सभापती भगवान मुरुमकर, जिप सदस्य सोमनाथ पाचरणे, सभापती सुभाष आव्हाड, कृउबा समितीचे सभापती गौतम उतेकर, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, पिंपरखेडचे सरपंच बापुराव ढवळे, फैयाज शेख, नगराध्यक्ष निखिल घायतडक, उपनगराध्यक्ष शाकीर खान, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.