Breaking News

मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची (इंडियन हायस्कूल) शतकाच्या दिशेने वाटचाल


स्व.तात्यासाहेब सप्रे 1922 साली 3 जुलै रोजी जी आय पी इंडियन हायस्कूल सुरू शाळेने 97 व्या वर्षात पदार्पण केले आहे .अनेक कर्तृत्ववान माजी विद्यार्थी होऊन गेले आहेत त्यांनी जीवनाच्या विविध अंगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहेे. ह्या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करणे उचीत ठरणार नाही.
शाळा मोठ्या प्रमाणात २०२२ सालि आपला शताब्दी मोहत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याचच एक भाग म्हणून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची सर्व माहिती गोळा करणे आणि त्यांची सूची तयार करण्याचे ( डाटा बेस ) तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हा शताब्दी पूर्तीचा सोहळा सर्वांच्या साथीने उत्तमोत्तम करण्याचा मानस आह. विविध समाज माध्यमाद्वारे आम्ही माजी विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत असून फेस बुक वर इंडियन हायस्कूल पास्ट स्टूडांत ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला आहे. पण ह्या शंभर वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न तोकडे पडतील हयात शंकाच नाही आणि म्हणून आम्हाला आपल्या साथीची अपेक्षा आहे
ह्या निमित्ताने मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी विद्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या इतर मित्राना देखील तसे कळवावे आपल्या सूचनांचे स्वागतचआहे.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्स अप क्रमक सचिन भोसले 9975913527, वर संपर्क साधावा किंवा harshadrgadre@gmail.com ह्या इ मेल आय डी वर संपर्क संपर्क साधावा .असे आवाहान ज्येष्ठ संचालक डॉ .सी एच बागरेचा ह्यांनी केले आहे