Breaking News

नवरात्रीत लोडशेडिंग बंद करा-काळे

बीड (प्रतिनिधी) : सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे. या महत्वाच्या दिवसात शासनाने लोडशेडिंग चालू केली असून ती त्वरीत बंद करावी अशी मागणी मांगगारुडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नवरात्र महोत्सव चालू आहे व हा उत्सव सर्व समाजात मोठ्या उत्साहात साजरा करतात. देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते. काही लोक कामामुळे रात्री दर्शनासाठी घराबाहेर पडतात. यात महिला, मुलींचा समावेश असतो. अशा वेळी शासनाने भारनियमन सुरु केले. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तरी त्वरीत भारनियमन बंद करावे.

अशी मागणी चालू केली आहे तीई लवकर बंद करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गोरख काळे, सचिन ईटकर, पंडित, कुराडे मच्छिंद्र, काळे अंबदास, मोहिते बालाजी, कुसळकर बळी, कुसळकर तानाजी, काळे किरण रोकडे, विलास शिंदे सह आदींनी दिला.