Breaking News

व्यसनमुक्ती एक सामाजीक चळवळ बनली पाहीजे- डॉ राजेश इंगोले


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- समाजातील पसरलेला व्यसणाधिणतेचा भस्मासूर अत्यंत वेगाने हजारो लाखों संसारांची राख रांगोळी करीत आहे.
याला जर प्रतिबंध केला नाही तर राष्ट्राची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष , सुप्रस्सीद्ध मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ञ डॉ राजेश इंगोले यांनी केले.भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ येथे जमात ए इस्लामी हिंद च्या वतीने आयोजीत व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य तरके , मुख्याध्यापक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ इंगोले यांनी व्यसनांचे प्रकार , व्यसणे कशी जुडतात , व्यसनाधिनतेची लक्षणे कशी ओळखावी , त्याचे शारीरिक व मानसीक परीणाम काय होतात आणी व्यसणे सोडवीन्याकरिता उपलब्ध उपचार पद्धती यावर शास्त्रोक्त मार्गदर्शन केले .बालपणापासूनच चांगले संस्कार , विचार , मूल्य जर बिंबविले गेले तर व्यसन जडन्याची शक्यता कमी होते त्यामुळे शिक्षणास आध्यात्माची जोड दिल्यास व्यक्ती विज्ञानवादी शिक्षित तर होतोच त्यासोबत संस्कारक्षम शीलवानही होतो असे मत डॉ इंगोले यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तवीक नईम पठान यांनी केले , सुत्रसंचलन शेख मुनीर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य एस एन तरके यांनी केले.