Breaking News

गरजूंसाठी मृत्युंजय या संस्थेची स्थापना


कोपरगाव प्रतिनिधी 

तालुक्यातील काही तरुणांनी एकजूट व एकसंघ होऊन गोरगरिबांना व गरजूना मदतीसाठी पुढाकार घेण्यास निर्णय घेतला. यासाठी परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज्यांच्या प्रेरणेने मृत्युंजय या संस्थेची स्थापना केली आहे. 

येथील काही सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक ऋण फेडण्याचे ठरवले. त्यामुळे या संस्थेच्या सभासदांनी दर महिना प्रति सदस्य १०० रुपये जमा करून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात गरजूंना ती मदत द्यायची ठरले. यातून या टाकळी येथील आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी यांच्या अद्यक्षतेखाली व्  कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या हस्ते या आश्रम शाळेला ८ हजार ५०० रुपये किमतीचे ध्वनी प्रक्षेपक सुपूर्त केले. यावेळी संस्थेचे खजिनदार सचिन वलटे, अजय महाले, अमोल चव्हाण, अमित वाकचौरे, विक्रांत महाले, अशोक बोळीज, संकेत पटारे, योगेश रोहोम आदी उपस्थित होते.