Breaking News

कृषि संशोधन विस्तार आणि सल्लागार समितीची बैठक संपन्न

राहुरी / प्रतिनिधी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विभागीय कृषि संशोधन विस्तार व सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी राज्याचे कृषि आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, फलोत्पादन संचालक श्री. प्रल्हाद पोकळे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिलीप झेंडे, श्री. रमेश भदानी, दशरथ तांभाळी तसेच कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. गजानन खोत, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी आणि सहयोगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शेंडे आदींसह कृषि विभागाचे अधिकारी, सहयोगी संशोधन संचालक, पीक विशेषज्ञ, विभागीय व जिल्हा विस्तार केंद्राचे विस्तार विद्यावेत्ता, कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक उपस्थित होते. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसारण केंद्राचे डॉ. पंडित खर्डे यांनी आभार मानले.