Breaking News

कोल्हापुरात भाजपला धक्का


कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार विजयी झाला आहे तर भाजपचे पृथ्वीराज यादव पराभूत झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल लागला. यात भाजपचा दारूण पराभव झाला आहे. 17 पैकी 9 जागांवर शाहू आघाडीचे उमेदवार निवडून आलेत, तर 7 जागांवर भाजपला समाधान मानाव लागलंय तर एक जागी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अमर माने यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली आहे.