Breaking News

मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण हवे : खेडेकर

जामखेड ता. प्रतिनिधी 

नोकर्‍या संपल्या असल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे तसेच मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. 

जामखेड मध्ये बुधवारी दि. १० मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत मराठा जनसंवाद दाैरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खेडेकर बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, मराठा सेवा संघाचे जामखेड तालुकाध्यक्ष राम निकम, डॉ. राजेंद्र पवार, अशोक शेळके, महाडिक, शहाजी वायकर, डाॅ. सुहास सूर्यवंशी, आशिष पाटील, वाळेकर, खेंगरे, प्रा. शहाजी डोके, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, बजरंग पवार, अवधूत पवार, संभाजी ढोले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, दिगंबर पवार आदी होते.