Breaking News

पत्रकारांवर नियोजित हल्ल्यांची शक्यता; शबरीमला परिसर सोडण्याचे पोलिसांचे आवाहन


पथानमथिट्टा : सन्नीधनम आणि पंबा हा परिसर सोडण्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले आहे. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांवर नियोजत हल्ले होऊ शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच महिला पत्रकारावर आंदोलकांनी हल्ला केला होता. 

सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. तीव्र आंदोलनामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आजतागायत या मंदिरात महिला प्रवेश करू शकल्या नाहीत. निलाक्काल परिसरात पत्रकारांच्या गाड्यांचा ताबा घेत आंदोलकांनी त्यांना बाहेर काढले होते. माध्यमांच्या गाड्यांची तोडफोडदेखील करण्यात आली होती. पम्बामध्ये माध्यमांच्या गाड्यांसह पोलीस आणि केएसआरटीसी बसेसवरही आंदोलकांनी दगडफेक केली होती.