Breaking News

तालखेडला चारा पाण्याअभावी पशुधन विक्रीसाठी बाजारात


तालखेड, (प्रतिनिधी)- तालखेड शिवारातील पावसाअभावी चारा नसल्याने व पाणी टंचाईमुळे पशुधनावर मोठे संकट आले आसुन शेतकरी हवालदिल झाले आहेत पशुधन सांभाळण्याऐवजी शेतकरी थेट बाजारात विक्री साठी नेत असल्याने प्रशासनाने तात्काळ छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांकडुन होत आहे. डतालखेड शिवारात यावर्षी सुध्दा पावसाने दांडी मारल्याने साधी पेरणी झाली नसल्याने व विहीर, बोअरची पाणी पातळी मध्ये घट झाल्याने चारा व पाण्यासाठी पशुधनावर उपासमारीची वेळ आल्याने शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडला असल्याने व पावसाअभावी पिके आली नसल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने पशुधनाची उपजीविका कशी भागवावी त्यामुळे नाईलाजाने शेतकर्‍यांना पशुधन सांभाळण्याऐवजी थेट आठवडी बाजारात विक्री साठी नेण्याची वेळ आली आहे व आठवडी बाजारात काही शेतकर्‍यांनी पशुधन बाजारात विक्री होत नसल्याने येणार्या पंधरा दिवसात महाभंयकर पशुधनावर मोठे संकट येवु शकते त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पशुधनाला चारा, छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांकडुन होत आहे. 

पशुधनावर उपासमारीची वेळ आल्याने आम्हाला नाईलाजाने बाजारात विक्री नेवावे लागत आहे व आम्हाला कवडी मोलाने पशुधनाची विक्री करावी लागत असल्याने आम्ही संकटात सापडलो आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी अजय राठौड यांनी दिली आहे. आठवडी राजेगांव बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी आनले जाते काही वेळेस पशुधन विक्री होत नसल्याने आम्ही शेतकरी दुहेरी संकटात सापडलो आहात प्रशासनाने तात्काळ पशुधनाला उपयोजना करुन छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.