Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार


विंचुर येथून जवळच असलेल्या अपर्णा प्राईडसमोर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिला ठार झाली.अपघातात ठार झालेल्या चंद्रकला उत्तम लाड वय ६० रा.औराळे ता.कन्नड असे महिलेचे नाव.याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ह्याबाबत पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकला लाड ह्या येथील कोथमिरे कुटुंबियांसमवेत येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावरती अपर्णा प्राईडसमोर असलेल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या होत्या. दर्शन करून रस्त्या कडेला उभ्या होत्या. यावेळी अज्ञात वाहनाने येऊन त्यांना धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्या, उपचारासाठी त्यांना लासलगाव येथील रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी निफाड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, सहा. पोलीस उपनिरी. मोहारे, पोलिस हवालदार योगेश शिंदे, पोलिस हवालदार घुगे करीत आहे.