Breaking News

महागाई विरोधात देवळा तहसील मोर्चा


देवळा (वार्ताहर ) मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे .याच्या निषेधार्थ आज (ता ५) रोजी शिवसेनेच्या वतीने पाचकंदील जवळ आंदोलन छेडण्यात आले . यावेळी नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत घसरत असल्यामुळे इंधनाचा दर नवीन उच्चांक गाठत आहे . पेट्रोल, डीझेलच्या किमतीत दिवसेंदिवस अधीकच वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे . धान्य,खाद्यान्न ,प्रवास सारेच महागल्याने अर्थकारण कोलमडले आहे .याच्या विरोधात देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने आज शुक्रवार दि( ५)रोजी तीव्र निदर्शने करण्यात येऊन या आंदोलन छेडण्यात आले . 

 यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार ,देवानंद वाघ,बापू जाधव ,भाऊसाहेब चव्हाण,विलास शिंदे, मोतीराम आहेर,विजय जगताप,डी के मोरे,रवींद्र चव्हाण, नंदू जाधव ,अशोक आहेर,प्रशांत शेवाळे ,सुनिल शिरसाठ, जि व्ही बागुल,विनोद आहेर,राकेश हेबाडे , गोरख विश्वास, प्रहारचे कृष्णा जाधव ,आबाजी बोरसे ,भास्कर आहिरे, प्रवीण आहेर ,भास्कर निकम,जगदीश कुवर,भाऊसाहेब चव्हाण,खंडू जाधव,पंडित शेवाळे ,महेंद्र आहेर,अमोल आहेर,भास्कर पवार,भूषण पवार,निलेश पवार,जिभाऊ पवार,कौतिक निकम आदी उपस्थित होते . देवळा - देवळ्यात शिवसेनेच्या वतीने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करतांना शिवसैनिक