Breaking News

तरुणांनी धरावी उद्योजकतेची कास-सुप्रसिद्ध उद्योजक उद्धव आहेर...


कळवण महाविद्यालयाच्या 'गिरिजा' विशेषांकाचे प्रकाशन...


कळवण प्रतिनिधी-देशाच्या आर्थिक उन्नतीत उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असल्याने उद्योगात पाऊल टाकतांना तरुणांनी सकारात्मक विचारांनी व धाडसाने उद्योजकतेची कास धरल्यास यशस्वी होण्यापासुन आपल्याला कोणीही रोखु शकत नाही असे प्रतिपादन आनंद अँग्रो समुहाचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध उद्योजक उद्धव आहेर यांनी व्यक्त केले.

कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या 'गिरिजा' या 2017-2018 च्या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन बुधवारी श्री.आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड.शशिकांत पवार होते.प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रावसाहेब शिंदे,सरचिटणीस बेबीलाल संचेती,विश्वस्त बाबुलाल पगार,विश्वस्त विश्वनाथ व्यवहारे,विश्वस्त रमेश पगार, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या सौ.वैशालीताई आहेर,प्राचार्या डॉ.सौ.उषाताई शिंदे,उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.के.आहेर,गिरिजाचे संपादक प्रा.राजेंद्र कापडे उपस्थित होते.
उद्योजक उद्धव आहेर पुढे म्हणाले की,आजच्या तरुणांनी परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती आत्मसात करुन संघर्ष आणि संकटांचा सामना करत समर्पक वृत्तीने काम करण्याची गरज असुन उद्योग व्यवसायात संयमाने काम करण्याची गरज असते.तरुणांनी नोकरीच्याच मागे न लागता स्वयंउद्योगावर भर द्यावा असे आवाहनही आहेर यांनी विद्यार्थ्यांना केले. प्राचार्या डॉ.सौ.उषाताई शिंदे यांनी विद्यार्थ्यांंना काळासोबत स्पर्धा करतांना काहीतरी वेगळे व नाविण्यपुर्ण काम करण्याचा सल्ला दिला.गिरिजाचे संपादक प्रा.राजेंद्र कापडे यांनी गिरिजाची गेल्या सव्वीस वर्षातील वाटचाल सांगुन प्रत्येक वेळी विद्यार्थी लेखकांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचे काम करत असल्याचे सांगीतले.अध्यक्षीय भाषणात अँड.शशिकांत पवार यांनी गिरिजाचे संपादक प्रा.राजेंद्र कापडे व विद्यार्थी लेखकांचे कौतुक केले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.के.आहेर यांना नुकतीच विद्यापिठाची पी.एचडी प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ.बी.एस पगार,प्रा.श्रीमती एम.व्ही बोरसे,प्रा.एच.डी.देशमुख, प्रा.आर.जी.भदाणे.प्रा.झेड.के.आहेर,प्रा.टी.बी खैरनार,प्रा.आर.बी.आहेर,प्रा.डॉ.मिलिंद वाघ,प्रा.डॉ.एस.जे.पवार,प्रा.श्रीमती.यु.के.पवार,प्रा.पुनम वाघेरे,प्रा.कोठावदे,प्रा.नंदनवरे,प्रा.कच्छवा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहल सोनवणे यांनी केले तर आभार गायत्री आब्बड यांनी मानले.


चौकट--(प्रतिक्रीया)


मुलींनीही व्यावसायिक दृष्टीकोन बाळगावा-
स्त्री ही देशाची शक्ती असुन आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असल्याने व्यवसायाकडेही सकारात्मक दृष्टीकोनातुन बघुन व्यवसायात
पाय रोवण्याची गरज आहे.ठराविक चौकटीत राहुन काम करण्यापेक्षा व्यवसायाच्या माध्यमातुन मुलींना आपली कर्तबगारी सिद्ध करण्याची संधी असते.
--सौ.वैशालीताई उद्धव आहेर,सदस्या,महाविद्यालय विकास समिती


चौकट-(प्रतिक्रीया)


'गिरिजा' ठरेल संदर्भग्रंथ--
कळवण महाविद्यालय गिरिजाच्या माध्यमातुन गेली सव्वीस वर्ष वैविध्यपुर्ण विषय घेवुन येत आहे.यंदाचा विशेषांक अर्थविचारांना वाहिलेला असुन चाणक्यापासुन ते कौटल्यापर्यंत आणि अर्थसंकल्पापासुन ते जीएसटी पर्यंत सर्व विषयांचा अंतर्भाव केल्याने हा अंक सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.-प्रा.राजेंद्र कापडे,संपादक,'गिरिजा' विशेषांक


चौकट---


'गिरिजा'त 25 वैशिष्टपुर्ण लेख--
कळवण महाविद्यालयाच्या सन 2017-2018 च्या 'गिरिजा' या विशेषांकात एकुण 25 विद्यार्थी लेखकांनी लिहीलेल्या लेखांचा समावेश असुन त्यात कौटिलीय अर्थशास्त्र,चाणक्यकालिन अर्थव्यवस्था,भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरण,अर्थसंकल्प,वस्तु व सेवा कर अशा विविध विषयांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा विशेषांक उपयुक्त ठरणार आहे.याआधी कळवण महाविद्यालयाच्या गिरिजा या विशेषांकास पुणे विद्यापिठाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असुन महाविद्यालयाचा 'लोकसाहित्य' हा विशेषांक साहित्य अकादमी तर्फे संदर्भग्रंथ म्हणुन यापुर्वी सुचित करण्यात आला आहे.