Breaking News

अन्नतंत्र महाविद्यालयात जागतिक अन्न दिन


आष्टी,(प्रतिनिधी):आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संचलित अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी येथे उत्साहात जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध पोषक अन्नपदार्थ बनवून त्याचे स्टॉल गंगाई नगरात लावण्यात आले होते.२०३० पर्यंत जागतिक भूकबळी कशी पूर्णतः थांबेल व त्यासाठी आपल्या काय कृती असाव्यात या विषयाला अनुसरून यावर्षी जागतिक अन्नदिन साजरा करण्यात आला. 

सदरील कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. डॉ. डी. बी. राऊत सर, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मोहळकर एस. एस. प्रा. कडभने व्ही. एस., प्रा. गिराम के. के. प्रा.जाधव बी. एन. प्रा. मुळूक एस. के.प्रा. वारे के. एस. प्रा. तिपाले एम. आर. श्री अनारशे दिपक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.