Breaking News

आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागडगांवच्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश


माजलगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील नागडगाव येथील शेकडो युवकांनी बीड जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे रामराजे सोळंके, धनंजय सोळंके, ऍड.दत्ता रांजवण, अतुल उगले आदिसह मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की, ८० टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करते.

यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात शिवसेनेच्या कामाचा वेग वाढता ठेवला आहे. यामुळेच नागडगांव येथील शेकडो युवकांनी सुद्धा शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून दिनांक ७ ऑक्टोंबर रविवार रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वसाला तडा जाऊ देणार नाही, असे आप्पासाहेब जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी प्रकाश गुळभिले, मंजुदास लंबाटे, विजय खामकर, शरद नेगुळे, अनंता कदम, रमेश सरवदे, अशोक खामकर, बाळासाहेब गुळभिले, तुळसीराज लंबाटे, बाळु खिस्ते, अंकुश खामकर, अमोल राठोड, संतोष राठोड, गणेश खामकर, परमेश्वर गवते, अनिल गुळभिले, उमेश गुळभिले, दिलीप मेढे यांच्यासह आदि युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.