Breaking News

जलयुक्त शिवारातील कामांच्या तपासणीसाठी दक्षता पथकाला दिले आदेश -वसंत मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेत अंतर्गत कामांची तपासणी व अधिकार्‍यांवर कार्यवाही करण्यासाठी ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले होते. यांच्या आंदोलनाची दखल घेत कृषी आयुक्त मंत्रालयातुन जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याचे अहवाल पाठविण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जलयुक्त सारख्या उपयुक्त योजनेला खिंडार पाडणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मुळाशी जाण्याचा निर्धार तक्रारदार गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कॉंग्रेसचे ओ.बी.सी.चे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या सातत्याने जलयुक्त शिवार अभियानाचे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हे प्रकरण आता मुळाशी गेले आहे. जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल तात्काळ पाठविण्याच्या सुचना कृषी आयुक्तालयाला मंत्रालयातुन देण्यात आल्या आहेत. 

मृदंसंधारणाच्या कामातून भरपूर मलिदा मिळत असल्यामुळे कृषी खात्यातील टोळीने मृदसंधारणाचा विभाग देखील स्वतःच्याच ताब्यात ठेवला आहे. वस्तूत: ही सर्व कामे जलसंधारण विभागाची असून शेतकर्‍यांना कृषी सल्ला देणे किंवा योजनांची माहिती देण्याचे काम सोडून कृषी कर्मचारी मृदासंधारणाच्या कामांमध्ये व्यस्त असतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. जलयुक्त शिवाराच्या कामात कृषी विभागाने राज्यभर घोटाळे केलेले आहेत. यापैकी बीड जिल्ह्यात घोटाळ्याचा अहवाल आम्ही मागविला आहे. त्यासाठी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना मृद व जलसंधारण मंत्रालयाने पत्र (क्रमांक जशिअ-२०१८- प्रक्र-४२९) पाठविण्यात आले आहे. तसेच अहवाल सादर करण्याच्या सुचना देखील जलसंधारण विभागानी दिल्या आहेत. कृषी खात्याने सोनेरी टोळीने कंत्राटदारांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी रुपयांची खर्च दाखविला आहे.