Breaking News

अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू


अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी (22 ऑक्टोबर) पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला

औरंगाबादहुन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.