Breaking News

शेलगाव देशमुख येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात जणांवर गुन्हा दाखल


डोणगाव,(प्रतिनिधी): एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगीक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना 20 ऑक्टोंबर रोजी येथून जवळच असलेल्या शेलगाव देशमुख येथे उघडकीस आली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील एका आरोपीस अटक करण्यात आली तर उर्वरीत आरोपी फरार आहेत. 

शेलगाव देशमुख येथील 14 वर्षीय मुलगी 13 ऑक्टोंबर रोजी रात्री गावातच राहणार्‍या तिच्या आत्याच्या घरी झोपायला जात होती. तिच्या मागावर असलेल्या आकाश भानुदास मोरे याने तिला एकटे पाहून उचलून नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका घरकुलात घेऊन गेला. तर थोड्याच वेळात सदर ठिकाणी पोहचलेल्या श्रीकांत सुरेश मोरे, संदीप सुभाष सदार व आकाश भानुदास मोरे या तिघांनी पिडीतेवर आळीपाळीने लैंगीक अत्याचार केले. नराधमांकडून होणार लैंगीक अत्याचार सहन न झाल्याने पिडीत चिमुरडी बेशुध्द पडली. त्यामुळे घाबरलेल्या या तिघांनी अन्य पाच जणांच्या मदतीने पिडीतेस तिच्या आत्याच्या पडक्या घरात नेऊन फेकुन दिले. शुध्दीत आल्यानंतर पिडीतेने आपबीती आपल्या कुटुंबियांना सांगीतली. तेव्हा त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न्ा केला असता आरोपींनी तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन 20 ऑक्टोंबर रोजी डोणगाव पोलिसांत आकाश भानुदास मोरे याच्यासह 7 जणांविरुध्द भादंविचे कलम 376, 201, 506 बी, 34 सह बाल लैंगिक अत्याचार कायदा (पास्को) 4 / 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल माळवे हे करीत आहेत. घडलेल्या घटनेमुळे डोणगावसह तालुक्यातून सतप्त प्रक्रिया उमटत असून उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.