Breaking News

भाजप महिला करणार नारीशक्तीचा सन्मान : डॉ. खेत्रे


कर्जत प्रतिनिधी

नवरात्रौत्सवानिमित्त महिला भाजपा आघाडीच्यावतीने राज्यात ‘जागर आदिशक्तीचा सन्मान नारीशक्ती’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस नगरसेविका मनिषा सोनमाळी आणि जिल्हा उपाध्यक्षा डॉ. कांचन खेत्रे यांनी दिली. 

भाजपचे पदाधिकारी प्रसाद ढोकरीकर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस नगरसेविका मंगल तोरडमल, तालुकाध्यक्षा मनिषा वडे, शहराध्यक्षा आशा क्षीरसागर, सारिका परहर, आशा वाघ आदी उपस्थित होत्या. डॉ. खेत्रे यांनी सांगितले, की हा कार्यक्रम राज्यातील आठ जिल्हयात होणार आहे. महिला आघाडीच्यावतीने प्रत्येक जिल्हयात वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ‘नारीशक्ती’चा सन्मान करण्यात येणार आहे. दि. १० पासून श्री क्षेत्र वनी, नाशिक येथून ही यात्रा सुरु होणार असून दि. १७ रोजी सातारा येथे यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, सचिव सुनिता कुलकर्णी, जिल्हाध्यक्षा सुरेखा विघे आदी सहभागी होणार आहेत. यात्रेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मनिषा सोनमाळी आणि कांचन खेत्रे यांनी केले आहे. 

अशी आहे रूपरेषा 

दि.१० रोजी नाशीक येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान भूमातेचा, 

दि. ११ ला नगर येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान कर्तृत्वाचा, स्वावलंबी आणि व्यावसायिक भगिनींचा, दि. १२ ला बुलढाणा येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान मातृत्वाचा, आणि अंगणवाडी सेविकांसह आशा सेविकांचा. दि.१३ ला परभणी येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान भक्तीचा, प्रवचनकार आणि किर्तनकार भगिनींचा. दि. १४ नांदेड येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान समरसतेचा, विविध समाज स्थरातील भगिनींचा, दि.१५ उस्मानाबाद येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान नेतृत्वाचा, महिला लोकप्रतिनिधीचा, दि. १६ रोजी कोल्हापूर येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान शाैर्याचा, सैनिकांच्या माता भगिनींचा, दि. १७ सातारा येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान साक्षरतेचा, लाडक्यालेकीचा.