पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची मोफत तपासणी


बीड, (प्रतिनिधी):- येथील पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची भव्य मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि.२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी होणार्‍या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकृपा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. 

बीड येथे पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारांसाठी हाडांची भव्य मोफत तपासणी करुन हाडांचा ठिसुळपणा मोजण्यासाठी बीएमडी (हाडातील कॅल्शीअमचे प्रमाण) शिबीर दि.२५, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत गुरुकृपा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटर द्वारकादास मंत्री बँकेच्या पाठीमागे जालना रोड बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. डॉ. प्रविण देशमुख हे स्वत: शिबीरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget