प्रवाशांना अरेरावी करणार्‍या डेपोच्या चालक वाहकावर कारवाई करा : कमलेश गायकवाड


नेवासा/प्रतिनिधी
प्रवाशांना अरेरावी करणार्‍या शेवगाव डेपोच्या त्या चालक वाहकावर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलेश गायकवाड यांनी जिल्हा विभागीय नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. थांबा असतांना ही नेवासाफाटयावर बस थांबवली जात नाही असा आरोप ही गायकवाड यांनी पाठवलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात कमलेश गायकवाड यांनी म्हटले आहे की शनिवारी दि.27 रोजी दरम्यान नेवासा येथून शेवगावकडे जाणारी गाडी ही वाजता नेवासाफाटा येथून न थांबताच गेली. या गाडीमध्ये नेहमी प्रवास करणारे प्रवाशी ही गाडीची वाट पहात थांबले होते गाडी न थांबविल्यामुळे प्रवाशांसह सरकारी कर्मचार्‍यांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला या गाडीचा स्व:त कमलेश गायकवाड
यांनी पाठलाग केला व वाहकाला गाडी का थांबविली नाही असा सवाल केला असता सदरच्या वाहकाने गायकवाड यांना अरेरावी केली व उर्मट भाषेत सुनावले. या संदर्भात कमलेश गायकवाड यांनी विभागीय व्यवस्थापक यांच्या नावे तक्रार अर्ज दाखल केली असून या उर्मट वाहक व चालकावर कारवाई
करावी. व कायमस्वरूपी येथे बस थांबवावी अशी मागणी केली असून याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कमलेश गायकवाड यांनी दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget