पाणी फाउंडेशन व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून १०५ गावांना पाणीपुरवठा केला जाणार- गांधी


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे सर्वत्र पाण्याचे टंचाई जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांनी माणसाना व मुक्या जनावरांना पाणी मिळणे अवघड जाणार आहे त्या करीता उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुर्व योजना म्हणून परळी तालुक्यामधील १०५ गावातील व्यक्तींना व त्या भागातील मुक्या जनावरांसाठी पानवठे (हौद) हे पाणी फाउंडेशन व परळी शहरातील दानशूर व्यक्ती, विविध संघटना, संस्था, पतसंस्था, बँका, सामाजिक संघटना यांच्या सर्वांच्या सहकार्याने गाव तेथे पाणी टँकर अशी शासनाच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक तथा सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांनी डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत व्यक्त केले.

या बैठकीमध्ये परळी शहरातील सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटना, पतसंस्था, बँका यांना निमंत्रण देण्यात येणार असून दि.२१/१०/२०१८ रोजी शहरातील सर्वांना निमंत्रीत करून पाणी पुरवठा बाबत बैठक घेण्यात येणार आहे. तसेच दि.२२/१०/२०१८ रोजी ही ग्रामीण भागातील सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांचीही उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील लोकसंख्या, जनावरे त्यांना लागणारा पाणीपुरवठा याबाबत यंत्रणा कशी राबवायची याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मा.उपजिल्हाधिकारी यांच्याशीही मयंक गांधी यांनी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की दि.५/१०/२०१८ रोजी परळी शहरामध्ये शहरी व ग्रामीण भागातील पाउस न पडल्यामुळे पाणी टंचाई बाबत, नगर परिषद, मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी 
व इतर संबंधित अधिकार्यांची बैठक घेण्यात येणार आहे व याबैठकीत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, शेती व कारखानदारी साठी पाणी याबाबत चर्चा होवून आराखडा तयार केला जाणार आहे व आम्ही त्याबाबत सुरवात ही केली असल्याचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितले तसेच वाण धरणातील जे अधिकृत व अनाधिकृत मोटार लावून पाणी घेणार्यावर शासकीय कार्यवाही करण्यात येणार असून मोटारी जप्त केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.वंगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वश्री पी.एस.घाडगे सर, डॉ.दे.घ.मुंडे, भैरवीताई गावडे, पत्रकार जी.एस.सौंदळे, आत्मलिंग शेटे, सतीश बियाणी, डॉ.शिवकांत अंदुरे, ऍड.सातभाई, दत्ताप्पा इटके गुरूजी, राजेश देशमुख, सुभाष ठक्कर, अतुल कदम, विजय गव्हाणे, कृष्णा राठोड इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget