सिंहाचा मृत्यू प्रकरणी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले


नवी दिल्ली : गीर अभयरण्यातील सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला फटकारले. सिंहाच्या मृत्यू प्रकरणी केंद्र आणि गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सवाल केला. हे अतिशय गंभीर प्रकरण असून, सरकारने लवकरच या प्रकरणाची चौकशी करावी असा आदेश न्यायालयाने दिला. हिंस्र श्‍वापद असलं तरी जंगलाच्या या राजाचं संरक्षण व्हायला हवं अशी महत्वापूर्ण भूमीका सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली. गीरच्या अभायरण्यातला जंगलाचा राजा धोक्यात सापडला. गीरच्या जंगलात गेल्या महिनाभरात 21 सिंहांचा मृत्यू झाला. हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावलेत. मेलेल्या 21 पैकी चार सिंहांना सीडीव्ही व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचतो. टांझानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहांची एक प्रजातीच नष्ट झाली होती. दरम्यान, या भागातील उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी रेस्क्यू सेंटरची एक विशेष टीम वेगाने कामाला लागली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget