क्लासच्या शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा केला विनयभंग


नवी मुंबईतील सानपाडा येथील एका खाजगी शिकवणी केंद्रात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तुमची मुलं क्लासेसमध्ये किती सुरक्षित आहेत याचा आताच विचार करा.
सानपाडामध्ये असलेल्या एकलव्य या खाजगी कोचिंग क्लासमध्ये एक अकरावीच्या विद्यार्थिनीवर त्याच क्लासच्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी ही साडेसतरा वर्षांची आहे. पीडितेवर तिच्याच क्लासच्या शिक्षकाने विनयभंग केला. त्यामुळे ही विद्यार्थिनीने अजूनही या धक्क्यातून सावरली नाहीय.

पीडित मुलीने आपल्या घरी सदर प्रकारची माहिती दिल्यावर कुटुंबीयांनी सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सानपाडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी शिक्षक अशोक जाधव याला अटक केली. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget