Breaking News

पोलिसांनी कत्तलखान्यावर पकडले ११० किलो गोमांस


।संगमनेर/प्रतिनिधी।

शहरातील देवीगल्ली परिसरात असलेल्या कसाईवाडा येथे अवैध पद्धतीने चालणाऱ्या गोवंशी जनावरांच्या मांस विक्रीवर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकला. सुमारे ११० किलो गोमांस जप्त केले. या कार्वाइत एकास अटक करण्यात आली. दरम्यान, आज दि. ७ सकाळी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शनिवारी, दि. ६ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सलीम चांद कुरैशी (रा. मोगलपूरा, संगमनेर) असे यात पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अभय परमार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील कसाईवाडा परिसरात अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीच्या उद्देशाने बाळगले जात असल्याचे समजले. त्यानुसार पो. नि. परमार आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. तेथे आरोपी सलीम कुरैशी हा अवैधरित्या गोवंश जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ११ हजार रुपये किंमतीचे ११० किलो गोवंश जनावराचे मांस जप्त करून आरोपीला अटक केली. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो. ना. रमेश लबडे करीत आहेत.