सेवानिवृत्त जवानाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

कुळधरण:प्रतिनिधी

सिमा सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवानाच्या प्रसंगावधानामुळे विजेच्या तारेला चिकटलेल्या एकाचे प्राण वाचले. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथे ही घटना घडली.

वायसेवाडी येथील समाज मंदिरात गावातील अनेक ग्रामस्थ बसलेले होते. त्यावेळी समोरच्या घराच्या व्हरांड्यात बाळू विठ्ठल पवळ यांचा एक हात विजेच्या तारेला चिकटलेला. त्यांच्या विचित्र हालचाली सुरू असल्याचे सेवानिवृत्त जवान छगन सूळ यांच्या लक्षात आले. काही तरी गडबड असल्याचे ओळखत त्यांनी तिकडे धाव घेतली. त्याच दरम्यान पवळ यांच्या पत्नीने त्यांच्या शरीराला हात लावून पाहिला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. तोपर्यंत सूळ तेथे पोहोचले. धावपळ पाहून आणखी काही लोक तेथे जमले. उपस्थित लोकांच्या मदतीने विजेचा पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर तारेला चिकटलेल्या पवळ यांची सुटका झाली. या धक्क्याने ते बेशुद्ध पडले. काही वेळातच सूळ यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना राशीन येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सेवानिवृत्त असलेले जवान छगन सूळ यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पवळ यांचा प्राण वाचला. त्याबद्दल त्यांचे गावात कौतुक केले जात आहे. 

जीव वाचविल्याचे समाधान 

सीमा सुरक्षा दलामध्ये सात वर्ष मेडिकल विभागात काम केले आहे. त्याठिकाणी आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचा या कडवट प्रसंगात फायदा झाला. एका गावकर्‍याचा जीव वाचू शकलो, याचे मोठे समाधान वाटते. 

- छगन सूळ, सेवानिवृत्त जवान. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget