Breaking News

अ. भा. से शेवगाव-खानापूर शाखाध्यक्षपदी थोरात


घोटण / प्रतिनिधी :

अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आ. अरुण गवळी आणि राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्या आदेशाने खानापूर येथील युवक कार्यकर्ते नानासाहेब थोरात यांची शाखाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. यासंदर्भात थोरात यांना मुंबई येथे आशा गवळी यांच्या हस्ते थोरात यांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले. 

यावेळी खानापूर येथील युवक मित्र विजय थोरात, रमेश पातळ, योगेश थोरात आदी उपस्थित होते. गावकऱ्यांनी नानासाहेब थोरात यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.