Breaking News

महिलांनी आरोग्य संभाळून दुर्गा सारखे सक्षम व्हावे-डॉ.मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- महिलांनी शारिरीक व मानसिक आरोग्य संभाळून दुर्गा सारखे सक्षम असले पाहिजे तसेच आपल्या परिवारासोबत स्वतः च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे मत येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित महिला आरोग्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संतोष मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, उद्घाटक म्हणून डॉ., संतोष मुंडे, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रामेश्वर लटपटे, डॉ. मनोज मुंडे, डॉ. पिंपळे मँडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर, प्रा.डॉ. विद्या देशपांडे, छायाताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे म्हणाले की, प्रत्येकाने प्रथम देशभक्ती मनात रुजवावी तसेच जे वंचित आहेत त्यांना मदत करावी. विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करण्याबरोबरच माणुसकी जपली पाहिजे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य जर चांगले असेल तर विविध संधीचे सोने विद्यार्थ्यांना करता येते, त्यासाठी आरोग्याची काळजी आवश्यक आहे. असेही डॉ. मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. लटपटे, रवींद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सचिव रविंद्र देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.