Breaking News

अनाधिकृत नळ कनेक्शन असल्यास कडक कारवाई


कूकाणा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा, कूकाणा , तरवडी, चीलेखणवाडी, अंतरवाली या गावांना वरदान असलेल्या संत ज्ञानेश्‍वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीला अखेर अनाधिकृत कनेक्शन वाढल्याने पाणी व्यवस्थापनास अडचणी निर्माण झाल्याने, कारवाई करण्यासाठी ठराव घ्यावा लागला आहे. 20आक्टोबर रोजी समितीची बैठक घेण्यात आली त्यात सर्वानुमते कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला आहे . भेंडा ते चीलेखणवाडी, तसेच अंतरवाली या मेन लाईनवर अनधिकृत कनेक्शन असल्यास पाणी चोरी करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलतराव देशमुख यांनी दिली आहे . तसेच भविष्यात तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टँकर चालू होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन दौलतराव देशमुख यांनी केले आहे.