Breaking News

लोकशाही विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष सोमाभाऊ शिंदे मनसेच्या वाटेवर...!


    अहमदनगर- शहरात सामाजिक कार्यात अल्पवधीत नावलौकीक केलेेले साेमा शिंदे यांचा मनसेत प्रवेश निच्छात झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षात फोडाफोडी व पळापळ सुरू आहे. प्रभागाच्या फेरबदलामुळे बडे मात्तब्बर पक्षांतर करीत आहे. त्यामुळे येणार्या काळात मनपा निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे.
सोमा शिंदे यांच्या मनसे प्रवेशाबाबत मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशनकर यांना याबाबत विचारना केली असता त्यांनी दुजोरा दिला. लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारीख निच्छित होणार आहे. शिंदे हे प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.
---------
गणेश ठोंबर