Breaking News

कामगारांच्या पगारासाठी त्याने घेतले कोंडून

शिर्डी / प्रतिनिधी 

साईबाबा संस्थानने नेमलेल्या एम पी कंपनीने अत्यंत जिकरीने स्वच्छतेचं काम करणाऱ्या कामगारांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन महिन्यांचे पगार थकविले आहेत. कंपनीच्या पगाराविषयी विचारना केली असता ही लोक भगत नावाच्या अधिकाऱ्याचे नाव सांगतात. त्याला फोन केला की, तो कधी सुट्टीवर असल्याचं सांगतो. तर कधी संस्थांनने आम्हाला अजून पेमेंट केलेले नाही, म्हणून आम्ही कामगारांचे पगार करू शकत नाही, अशी उडवा-उडावीचे उत्तर देत आहे. या प्रकाराला कंटाळून शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी ऑफिस मधील कर्मचाऱयांसह स्वतःला कोंडून घेतले. जोपर्यंत कामगारांच्या पगाराच्या आणि दिवाळी बोनसच्या बाबतीत तातडीने निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत इथून बाहेर पडणार नाही, अशी त्याने भूमिका घेतली आहे. या कंपनीने आऊटसोर्स कामगाराचे आतापर्यंत अनेक वेळा पगार थकविले आहेत. तसेच पी एफ जमा केलेला नाही. कामगारांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. करारनाम्यातील नमूद मशिनरी उपलब्ध नाही.