बंदीनंतरही भारत करणार इराणकडून तेलाची आयात


नवी दिल्ली : अमेरिका सरकारने इराण आणि रशियावर 4 नोहेंबरपासून सगळ्याच बाजूने प्रतिबंध लावले आहेत. मात्र भारताने या प्रतिबंधाला विरोध केला आहे. भारत फक्त संयुक्त राष्ट्रांच्याच नियमांचे पालन करतो. इतर कोणत्याही देशांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करण्यास भारत कटिबद्ध नसल्याचे या अगोदरच भारताने स्पष्ट केले आहे.

एवढेच नाही तर रशियावर लावण्यात आलेल्या बंदीनंतरही भारताने नुकताच रशियासोबत एस-400 या लढाऊ विमानांचा करार केला आहे. तसेच भारताच्या 2 कंपन्यांकडून कच्च्या तेलाची मागणीही करण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिका मात्र नाराज झाली आहे. नाराज अमेरिकेने ’बघून घेऊ’ असा अप्रत्यक्षपणे इशारा भारताला दिला आहे. भारताची आणि इराणची मैत्री खूप जुनी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांच्या काळातही इराणवर बंदी लावण्यात आली होती. तेव्हासुध्दा भारताने या बंदीस विरोध केला होता. कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात ट्रम्प सरकारचे काही प्रशासकीय अधिकारी पुढच्या आठवड्यात भारताच्या दौ़र्‍यावर येणार आहेत. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget