Breaking News

‘साई एम्लाईज’च्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा मंजूर


शिर्डी / प़तिनिधी

साईबाबा संस्थानच्या साई एम्लाईज सोसायटीचे चेअरमन प्रताप कोते आणि व्हाईस चेअरमन जितेंद्र गाढवे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तो नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यामुळे कामगारांत मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयावर चर्चा झाली. दरम्यान, या पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.