Breaking News

सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव


बीड : शासनाने शेतकऱयांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ४०० रुपयांचा हमी भाव जाहीर केला असला तरी बीडच्या बाजार समितीमध्ये केवळ ३ हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी होत असल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. नाफेड अंतर्गत अद्यापपर्यंत शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकऱयाला खासगी व्यापाऱयाला मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
ज्या प्रमाणात खरिपांच्या पिकांची पेरणी झाली होती. त्या तुलनेत बाजारात शेतमालाची आवक झाली नाही. पाण्याअभावी पिके उध्वस्त झालेली आहेत. यंदा बीड जिल्ह्यात ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्या तुलनेत बाजारात सोयाबीन येत नसल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. 

बीड येथील बाजार समितीमध्ये खासगी व्यापाऱयांकडे ऑक्टोबर महिन्यात केवळ ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. इतर खरीप पिकांमध्ये आतापर्यंत उडीद पीकाची केवळ ४८० क्विंवटलची आवक झालेली आहे.