Breaking News

सु-जोक थेरपी शिबिरामध्ये ७५० रुग्णांची तपासणी

कोपरगाव / प्रतिनिधी

येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगावच्यावतीने डॉ. संजय वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत सु-जोक थेरपी शिबिरामध्ये एकूण ७५० रुग्णांची विविध आजारांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शिबिराचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये पाठीचे दुखणे, नस दाबणे, लकवा, मायग्रेन, ऍसिडिटी, मूळव्याध, केस गळणे, त्वचेवरील मोस, त्वचारोग, लठ्ठपणा, मुतखडा, ब्लडप्रेशर, शुगर आदींसह विविध आजारांवर सु-जोक थेरपीद्वारे डॉ. संजय शर्मा यांनी मार्गदर्शन करून रुग्णांची तपासणी केली. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, युवानेते आशुतोष काळे यांचे सु-जोक थेरपी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, स्वप्नजा वाबळे, रमा पहाडे, मायादेवी खरे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सदस्या तसेच हिरामण गंगुले, लखन लिंभूरे, प्रकाश पंडोरे, सोमनाथ जाधव, संतोष सुपेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.