Breaking News

मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरणार्‍यावर कठोर कार्यवाही करावी


गेवराई (प्रतिनिधी) मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर वादग्रस्त मेसेज व्हायरल करणार्‍या युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजबांधवांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मोबाईल नंबर ७३८७५४२०६८ या नंबर वरून फक्त शिवसेना या व्हॉट्सऍप ग्रुप वर अत्यंत खालच्या पातळीवर भाषेत इस्लाम धर्माच्या मोहम्मद पैगंबर सहाब यांच्याबाबत लिहून समस्त मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, सदर पोस्ट द्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट टाकली आहे, सदर व्हॉट्सऍप ग्रुप फक्त शिवसेना या नावाने आहे, या ग्रुपवर मोबाईल नंबर धारक ७३८७५४२०६८ या धारकाने मोहम्मद पैगंबर सहाब व यांच्याबाबत अत्यंत खलच्या पातळीवर भाषेत मजकूर व्हायरल करून संपूर्ण इस्लाम धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, सदर अत्यंत खालच्या पातळीवर मजकूर टाकणार्‍या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. सदर पोस्ट मुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अशा पोस्ट व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी सर्व समाज बांधवांनी गेवराई चे पोलीस निरीक्षक आहेर देण्यात आले आहे. यावेळी समाज बाधंव उपस्थित होते.