Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चाशेवगाव प्रतिनिधी ( रवी उगलमुगले )

शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज शेवगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला,यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत भारनियमनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला,

ऐन सणासुदीच्या काळात राज्यामध्ये व अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियम वाढले आहे,त्यामुळे एकूणच शेतकरी,विद्यार्थी,यांच्यावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम होत आहे,रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाण ही या भारनियमामुळे वाढले आहे,विज महामंडळाकडून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा तसेच रात्री अवेळी भारनियम केले जाते, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नसतानाही शेतकऱ्यांवर भारनियमनाची वेळ यायला नको असताना ही भारनियम केले जात आहे,याला जबाबदार वीज महामंडळाचे अधिकारी व सरकार आहे,शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे गरजेचे असताना रात्रीच्या वेळी मुद्दाम लाईट सोडलीे जाते,रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर विंचू,साप तसेच बिबट्याचे हल्ले होण्याची भीती जास्त आहे,ऑक्टोबर मध्ये प्रचंड उष्णता असतानाही घरगुती वापराची वीज जायला नको तरीसुद्धा लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे,त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे या सर्व गोष्टींमध्ये जर सुधारणार नाही झाली तर मोठा उद्रेक होईल व यास शासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील भविष्यकाळात यामध्ये सुधारणा न झाल्यास माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळगे त्यांनी दिला,या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उपकार्यकारी शाखा अभियंता चिंचाणे यांना कंदील भेट घेऊन निवेदन दिले,यावेळी कोळगे यांनी सरकारचा यावेळी तीव्र शब्दात निषेध केला,तसेच यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली,भारनियमनाच्या या प्रश्नाबरोबरच पिंगेवाडी,लखमापुरी,चांगतपुरी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी ही या वेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या तसेच कांबी येथील सिंगल फेजचे काम पूर्ण का होत नाही,अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी चिंचाणे यांना केली,

आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,ताहेर पटेल,नंदू मुंढे,भागवत लव्हाट, नगरसेवक सागर फडके,अनिल सरोदे,संतोष जाधव,गंगाशेठ पायघन,संतोष पावशे,मोहित पारनेर कैलास मस्के इमरान शेख नितीन बटुळे,गोविंदा किडमिंचे, मोबीन तांबोळी आदीसह युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट


शेवगांव तालुक्यामध्ये विजेची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने येणारी वीज ही तालुक्यासाठी अपुरी पडत आहे, परंतु येत्या दोन-तीन दिवसात हे भारनियम पूर्णपणे कमी करण्यात येईल व तालुक्यामध्ये सुरू असलेले भारनियमन बंद करण्यात येईल.
शंकर चिंचाणे शाखा अभियंता शेवगाव