Breaking News

नाशिक परिमंडल उपाध्यक्षपदी लावरे


रहाता प्रतिनिधी

महाराष्ट्र स्टेट वर्क्स फेडरेशनच्या नाशिक परिमंडल उपाध्यक्षपदी राहाता येथील नामदेव लावरे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक काॅम्रेड व्ही. डी. धनवटे यांनी लावरे यांना सदर निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी पार पडलेल्या बैठकीस सर्कल अध्यक्ष नाना कचरे, सचिव सदाशिव भागवत, विभागीय सचिव रविंद्र कानडे, जालिंदर गोसावी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नाशिक परिमंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विज कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कदम, विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संदिप जैन, डी. एस. मुजमुले, व्हाईस चेअरमन दिलीप चौधरी, एन. बी. मोरे, संदिप निर्मळ, संजय गुंजाळ, अशोक कापसे, अभय थोरात, संजय देसले आदींनी लावरे यांचा सत्कार केला.