Breaking News

दोन वर्षांनंतरही वर्दळीच्या रस्त्याचे काम ठप्प


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

शहरातील सुभद्रानगर भागातील मुख्य रस्ता असलेल्या मार्केटयार्ड-जानकी विश्व-येवला नाका या नेहमी वर्दळ असणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दोन वर्षांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरु झाले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.

या रस्त्यावरून दिवसभरात शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक ये-जा करत असतात. संजीवनी कारखाना, कॉलेज, शारदा स्कूल, एससीजीएम कॉलेज, शेटे क्लासेस, येवला नाका ते निवारा, गोकुळनगरी, श्रद्धानगरी आदी भागांना जोडणाऱ्या या रस्त्यावर रोज किमान १० ते १५ छोटे छोटे अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित मार्गी न लागल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे या परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धीपत्रकादवरे सांगितले.