नूतन माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश


मिरजगाव/प्रतिनिधी
मिरजगांव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अनुष्का संजय निंबाळकर हिने 14 वर्षे वयोगट नेटबॉल स्पर्धेत राज्य पातळी निवड चाचणीपर्यंत मजल मारली असुन सोलापूर येथे झालेल्या विभागीय स्तर नेटबॉल निवड चाचणीमधून उत्कृष्ट खेळाचे नैपुण्य दाखवले म्हणून तिची राज्य स्तरावर निवड करण्यात आली. असून ती गोंदिया जिल्ह्यात 27/10/2018 रोजी होणार्‍या राज्य स्तरीय नेटबाँल निवड चाचणीत सहभागी होणार आहे. तिला क्रीडा शिक्षक शांताराम बावडकर सर, संतोष नलगे सर, मनिषा घोगरे तसेच प्रशिक्षक किशोर पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल अनुष्काचे विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ टकले, उपप्राचार्य रघुनाथ शिंगाडे, पर्यवेक्षक जयंत चेडे, सुशिला क्षिरसागर, संजय निंबाळकर, तसेच नूतन विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी वर्गानी तिचे कौतुक केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget