Breaking News

अंबाजोगाई येथील संविधान गौरव सोहळ्यास हजर राहा विजय साळवे


माजलगाव( प्रतिनिधी ):-येथील शासकीय विश्राम गृहावर रिपाई एकता वादी ची तालुका बैठक संपन्न झाली बीड जिल्हा संविधान गौरव परिवाराच्यावतीने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे सायंकाळी ठीक चार वाजता संविधान गौरव सोहळा होणार आहे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गायक आनंद शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत ठेवण्यात आलेला आहे तरी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई एकतावादीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विजय साळवे यांनी केले आहे संविधानाची अमलबजावणी योग्य पद्धतीने केल्या जात नाही कारण संविधानाचे अमलबजावणी करण्याचा उच्च पदावर संविधान विरोधी विचार राबविणारे नेते मंडळी आहेत म्हणून भारतीय संविधानाला जास्तीत जास्त बदनाम करण्याचे काम ही लोक करीत आहेत .

तरी बहुजन समाजातील तरुणांनी प्रशासनातील उच्च पदाच्या व मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन भारतीय संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करून आपल्या भारत देशातील विविध जातीधर्माच्या लोकांच्या विकासासाठी संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी व या संविधानाची जास्तीत जास्त माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून बीड जिल्हा संविधान परिवाराच्यावतीने अंबाजोगाई येथे संविधान गौरव सोहळा दिनांक अकरा रोजी सायंकाळी चार वाजता आयोजीत केला आहे त्याची तयारी माजलगाव येथील शासकीय विश्रामग्रह घेण्यात आली माजलगाव तालुक्यातील पाच हजार 
भीमसैनिक या सोहळ्यास घेऊन जाणार असल्याचे विजय साळवे यांनी सांगितले या सोहळ्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज भाई संसारे ,रिपाई नेते तानसेन ननावरे ,ज्येष्ठ विचारवंत अर्जुन तांगडे ,विकास निकम आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रसिद्ध आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आनंद शिंदे यांचा बीड जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे या मेळाव्याचे आयोजन तालुका अध्यक्ष पंकज सोनवणे ,दयानंद कांबळे ,प्रशांत रोडे,प्रशांत वैद्य युवराज कांबळे यांनी केले आहे मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन विजय साळवे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सिनगारे ,शैलेंद्र पोटभरे ,पंडित झिंजुर्डे ,सुरेश रोडे पंडित ओव्हाल 
अंजेराम घनघाव,रामदास टाकणखार ,अजय साळवे यांनी केले आहे